8 (1)
IMG_0297
Foto From Vighnahar Karkhana dt.25.10.2017
DSC_8314
4 (1)
१९८० चे दशकामध्ये जुन्नर / आंबेगांव हे तालुके म्हणजे मागासलेले व दुर्गम डोंगरी भागातील अविकसीत तालुके म्हणून ओळखले जात होते. सिंचनाची कोणतीही सोय नसलेने शेतकऱ्यांचा कल पारंपारीक पिके घेण्यावरच होता. सर्व परिस्थीती पाहून शेतकऱ्यांचे जिवनमान उंचविण्यासाठी काहीतरी केले पाहीजे या जाणीवेतून एक माणूस झपाटल्या सारखा कामाला लागला तो माणूस म्हणजे स्व. खासदार निवृत्तीशेठ शेरकर.
पारंपारीक पीकांपासून शेतकऱ्यांना वळविण्यासाठी शेतीमालावर प्रक्रिया करणारा कारखाना म्हणजेच साखर कारखाना उभारण्याचा त्यांनी विडा उचलला. व १९८१ साली त्यांनी श्री विघ्नहर सह.सा.का.लि. ची मुहूर्तमेढ रोवली.
आजवर आम्ही कारखाण्याद्वारे १०+ विविध प्रकल्प आणि योजना राबवल्या आणि यशस्वी केल्या आहेत.
स्थापना वर्ष १९८१ पासुन आजवर ६० राज्य व राष्ट्रिय स्तरावरिल पारितोषिके आणि पुरस्कार प्राप्त झाले आहे.
चेअरमन श्री. सत्यशिलदादा शेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे संचालक मंडळ यशस्वीरित्या वाटचाल करत आहे.